ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिरपूर तालुक्यात 930 नामनिर्देशन पत्र दाखल 10 अर्ज बाद




 शिरपूर प्रतिनिधी-  शिरपूर तालुक्यात ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून दिनांक 28 डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाले होती यात आज दिनांक 31 डिसेंबर पर्यंत  शिरपूर तालुक्यात होऊ घातलेल्या 34 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी 930 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. यात छान छाननीनंतर 10 अर्ज बाद झाले असून मांडळ 2 ,सावडदे 1, जवखेडा 2, व होळ 1, भाटपुरा 1, दहिवद1 , चाकडू 1,बाळदे 1 अश्या गावातून 10 अर्ज बाद झाले आहेत. 52  जागेवर विरोधात अर्ज न दाखल झाल्याने या जागा बिन विरोध झाल्या आहेत. यात 4 जानेवारी च्या माघारी मुदत नंतर अंतिम चित्र समोर येईल. तालुक्यातील घोडसगाव व पिंपडे तांडा , वाठोडा या ग्राम पंचायती बिन विरोध झाल्या असून माघारी नंतर अजून काही ग्राम पंचायत बिन विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने