शिरपूर प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील दिनेश सुरेश बोरसे यांना नुकताच राज्यस्तरीय पक्ष मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिनेश बोरसे हे तालुक्यात सर्प मित्र व पक्ष मित्र म्हणून सुपरिचित असून पर्यावरणाचे रक्षण करणे, प्राणिमात्रांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करून ते पक्षीप्रेमी म्हणून काम करत असतात .आजवर त्यांनी अनेक सर्प आणि पक्षांना जीवनदान दिले आहे. व निसर्ग वासात सोडण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत यांच्यावतीने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिमत्वांना त्यांच्या पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य व कला या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणा-या समाजसेवकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवुन पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारतचे संस्थापक अध्यक्ष मा श्री देवा तांबे यांनी आपल्या संस्थेच्या सोशलमिडीया पेजवर पुरस्कार जाहीर झालेल्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. समाजात विविध क्षेत्रात कार्य करणा-यांना प्रेरणा देऊन त्यांनी महान कार्य केले आहे. शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रहीवासी असलेले श्री दिनेश बोरसे यांनी गेल्या दशकापासून सर,पशु,पक्षी,घोरपड ,प्राणी सर्प कोल्हा, उदमांजर व ईतर जंगली जनावरांना जीनदान दिले आहे त्यांनी गांव व शहरात अनेक सामाजिक कार्य केली आहेत व करत आहेत याच कार्याने प्रभावीत होऊन पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या निवड समितीने त्यांना "पक्षी मित्र २०२०"हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.
बारामती येथील पर्यावरण मित्र मंडळ बहुउद्देशीय संस्था भारत यांच्या तर्फे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या गौरव करण्यात आला. दिनांक 22 डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने 140 मान्यवरांच्या गौरव करण्यात आला यात वाघाडी येथील दिनेश बोरसे यांच्या कार्याची दखल घेण्यात आली व कोरोना काळात देखील पर्यावरणाचे हित जोपासत पक्षीमित्र व सर्पमित्र म्हणून उल्लेखनीय काम केले म्हणून त्यांना पक्षी मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. बोरसे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कडून अभिनंदन होत आहे.
Tags
news

