- अक्कलकुवा जि.नंदूरबार तालुक्यातील एकूण १५ गावातील २५९ कुपोषित बालकांना Y4D फौंडेशन,पुणे,युवकमित्र परिवार नंदूरबार'यांच्यातर्फ 'डीएम फेलो उपक्रमातर्गत 'महाशक्ती न्यूट्रिशन अँड मल्टीव्हिटॅमिन सॅचेट'वितरित करण्यात आले.एकूण ९ व्हिटॅमिन असणारे हे सॅचेट कुपोषित बालक व त्यांच्या माता यांना जीवनसत्व पुरवते.अक्कलकुवा तालुक्यातील कुपोषण निर्मूलनासाठी 'युवकमित्र परिवार नंदूरबार'या संस्थेचा प्रयत्न असून 'पोषण आहार जनजागृती'उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.यासाठी पिरामल फौंडेशन डीएम फेलोशिप च्या १५ फेलो स्टुडन्टनी आदिवासी पाड्यामध्ये जाऊन कुपोषित बालक शोधमोहीम राबवत तब्बल २५९ बालकांचा शोध घेतला होता.व यादी सादर केली होती.अशा सर्व बालक व त्यांच्या मातांना हे किट वाटप करण्यात आले.यासाठी युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन,Y4D फौंडेशनचे व्यवस्थापक सागर मानकर यांनी न्यूट्रिशन किट उपलब्ध करून दिले.डीएम फेलो डिस्ट्रीक मॅनेजर किशोर घरत,अक्कलकुवा तालुका डीएम फेलो प्रमुख कु.दविंदर कौर यांच्या मार्गदर्शनाखाली डीएम फेलो कु.शुभम शिरसोले,बेनिटो जायडस,मोहम्मद हबीब,अर्पित चौधरी,यश अहिराव,तुषार महिरे,पियुष भादे,के.हबीब,सौमेन साऊ यांचे सहकार्य लाभले.
Tags
news
