अंबानी कॉर्पोरेट हाऊसवर (मुंबई)शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा




प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व राज्य मंत्री मा.बच्चूभाऊ कडू ,बाबा आढाव,खा.राजू शेट्टी,मेघा पाटकर,प्रतिभा शिंदे,आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाचा शेतकऱ्यावर लादललेल्या १)केंद्र सरकारने किसान विरोधी कायदे रद्द करून शेती खाजगी कंपनीच्या ताब्यात जाणे पासून वाचवा. २)स्वामिनाथन आयोग लागू करून उत्पादन खर्च धरून 50% नफ्यासह शेती हमीभाव जाहीर करा. या प्रमुख मागण्या सह जिल्हा अधिकारी कार्यालय उपनगर बांद्रा मुंबई ते अंबानी कॉर्पोरेट हाऊसवर (मुंबई)शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा काढण्यात आला,या वेळी धुळे जिल्हा शिंदखेडा तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष तलुका अध्यक्ष मा.श्री.पंकज भाऊ सिसोदिया, तालुका सहसचिव श्री. हितेश भाऊ पाटील,दोंडाईचा अध्यक्ष पंकज भाऊ चोधरी, उपाध्यक्ष कैलास भाऊ तिरमली, महिला अध्यक्ष सिमाताई बागले, रिना ताई, कविता महाजन व ईतर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने