शिरपूर : तालुक्यातील वरूळ येथील एच. आर. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन व प्रतिमापूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. साळुंखे होते.
प्राचार्य पी.आर साळुंखे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली. तसेच एन. एस. ढिवरे यांनी बाबासाहेबांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आपल्या भाषणातून व्यक्त केले.
या प्रसंगी रासेयो विभाग प्रमुख आर.आर. रघुवंशी, श्रीमती एम. आर. पाटकर, डी. ए. जाधव, एस. जे. पाटील, एस. के. पाटील, एम. एस. पाटील, एस. सी. शिंपी, ए. बी. महाजन, डी. एन. माळी, बी. एस. बडगुजर, पी. टी. पवार, बी. एस. पारधी, एल. बी. ठाकरे, पी. बी. जैन, बापू भिल उपस्थित होते.
Tags
news
