दराणे ग्रामपंचायतीवर पुन्हा शिवसेनेचा झेंडा लोकनियुक्त सरपंच संगीताबाई पवार यांचा जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते सत्कार




*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : तालुक्यातील दराणे गाव येथे लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक आज दि. 22 डिसेंबर 2020 रोजी पार पडली. यात सरपंचपदी शिवसेनेच्या संगीताबाई शिवाजी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्रीमती धुडकाबाई बाबुराव नंदाळे यांच्या अकाली निधनामुळे सरपंच पदाची जागा रिक्त होती.
       नवनियुक्त सरपंच यांचा सत्कार शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे तालुका संघटक शानाभाऊ धनगर, शिवसेना विभागप्रमुख मनोज पवार, ग्रामपंचायत सदस्य शितल रामकृष्ण पवार, गेंदीलाल चिंतामण पवार, रविंद्र धनगर, पोलीस पाटील जितेंद्र पवार, अशोक पवार, विश्वास पवार, रामकृष्ण पवार, प्रमोद पवार, ईश्वर धनगर, निलेश पवार, रोहाणेचे पोलीस पाटील कृष्णा वाघ, बुथप्रमुख सुकदेव बागुल, ग्रामसेवक जगदीश सोमवंशी, ग्रा.पं. शिपाई प्रेमसिंग गिरासे, गणेश गिरासे आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने