एच. आर. पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 'मेक युवर डीआयवाय मायक्रोस्कोप' विषयावर ऑनलाइन कार्यशाळा संपन्न




शिरपूर : शहरातील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अटल टिंकरिंग लॅब व होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने 'मेक युवर डीआयवाय मायक्रोस्कोप' या विषयावर 3/12/200, 10/12/2020, 17/12/2020 व 24/12/2020 या चार दिवशी दुपारी 3:30 ते 5:00 या वेळेत कार्यशाळा संपन्न झाली.

ही कार्यशाळा होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर मुंबई येथील सीनियर फॅकल्टी प्रोफेसर नागार्जुन. जी व शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. कार्यशाळेचे नियोजन व कार्यवाही प्राचार्य आर. बी. पाटील व अटल को-ऑर्डिनेटर एन. ई. चौधरी यांनी केले.

चार दिवसीय कार्यशाळेत रवी सिन्हा, आशिष परदेशी, जुड टेरेन्स डिसूजा, सुरेंद्र पाटील, दुर्गा प्रसाद, रफिक शेख या सर्व तज्ञ मार्गदर्शकांनी शिरपूर एज्युकेशन सोसायटी येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर, एच. आर. पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर, आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल शिरपूर, एम. आर. पटेल मिलिटरी स्कूल तांडे ता. शिरपूर या 4 शाळेतील 8 शिक्षक व 45 विद्यार्थ्यांना 'मेक युवर डीआयवाय मायक्रोस्कोप' या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी अटल इन्चार्ज बी. एस. महाजन, व्ही. डी. पाटील, एन. एस. बाविस्कर, ललित सोनवणे, जी. के. सोनवणे, श्रीमती पी. आर. मोरे, श्रीमती व्ही  आर. महाजन, के. एस. तायडे यांनी प्रयत्न 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने