पत्रकार भिका पाटील यांच्यावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार




धुळे-शिंदखेडा येथील दै.लोकमतचे तालुका प्रतिनिधी भिका पाटील यांच्यावर वाळू माफियांनी केलेल्या हल्लेखोरांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल.तसेच प्रशासनातील देखील कर्तव्यात आणि दायीत्वात कसुर करणार्‍यांवर देखील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले.
पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे.लोकशिक्षणाचे आणि गैरकृत्य उजेडात आणण्याचे काम सातत्याने करीत असतात.निर्भिड पत्रकारिता करणार्‍या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील लोकमतचे प्रतिनिधी भिका पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे. ते अंनिसचे काम देखील करतात.समाजात त्यांची प्रामाणिक आणि सचोटीने काम करणारे पत्रकार म्हणून ओळख आहे.त्यांच्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्याचा आम्ही तिव्र निषेध करतोे.महसुल आणि संबंधीत यंत्रणेतील भ्रष्ट प्रवृत्तींमुळे वाळू माफियांना अभय मिळते अशी कैफियत पत्रकारांच्यावतीने दै.आपलं नवराज्यचे संपादक सुनिल पाटील यांनी मांडली.
पत्रकार भिका पाटील हे 7 डिसेंबर रोजी शिंदखेडा तहसिल कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी वाळू माफियांनी त्यांना धमकावले.तरी देखील श्री.पाटील यांनी सामंजस्याची भुमिका घेतली.वाळू माफियांनी त्यांना आसाणे गावात गाठले.पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली.त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला.स्थानिक गावकर्‍यांच्या मदतीने त्यांचा जीव वाचू शकला.अन्यथा वाळू माफियांनी एका प्रामाणिक पत्रकाराला जीवेठार मारले असते.
भिका पाटील यांच्यावर धुळे शहरातील देवरे हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.अजूनही त्यांची प्रकृती स्थिरावलेली दिसत नाही.पाटील यांच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी समाधानकारक भुमिका घेतली आहे.त्यांचे आम्ही अभिनंदन करतो,मात्र हल्लेखोरांना प्रोत्साहन देणार्‍या यंत्रणेला देखील वठणीवर आणणे जिल्हा प्रशासनाचे काम आहे.असे प्रकाश देखील यावेळी सुनिल पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिला.वाळू माफियांविरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी यावेळी केली.
महसुल आणि पोलिस प्रशासनाने अशा वाळू माफियांचा कायमचा बंदोबस्त करावा आणि पुन्हा कुठल्याही पत्रकारावर हल्ला होणार नाही याची काळजी घ्यावी अशी बाब देखील निवेदनातून निदर्शनास आणून दिली.सदर प्रकरणी गांभिर्याने दखल घेतली असून आरोपींना रात्रीस  अटक केल्याचे यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला सांगितले.धुळे जिल्ह्यातील पत्रकारीता ही निष्पृह आणि प्रशासनाला कायमच सहकार्य करणारी राहीली आहे. असे देखील जिल्हाधिकारी संजय यादव यावेळी म्हणाले.तात्काळ संबंधितांवर तसेच यंत्रणेतील जबाबदार अधिकार्‍यांवर देखील दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले.यावेळी झी-24 तासचे प्रशांत परदेशी, लोकमतचे अतुल जोशी,चंद्रकांत सोनार, सुनिल बैसाणे,ई टीव्हीचे धनंजय दिक्षीत,दै.व्यंगनगरीचे राजेंद्र सोनार,दै.लक्ष महाराष्ट्रचे दिपक वाघ,दै.दिव्य मराठी निलेश भंडारी, दै.महासमरचे किशोर पाटील,जय महाराष्ट्र वृत्त वाहिणीचे मनिष मासुळे, न्युज 18 लोकमतचे दिपक बोरसे, आरएनओ न्यूज एजन्सीचे नागींद मोरे, स्वराज न्यूजचे अजिम शेख, श्रीराम टीव्ही वृत्त वाहिणीचे रविंद्र नगराळे,दै.आपलं नवराज्यचे छायाचित्रकार मनोज बैसाणे,धुळे एक्सप्रेस न्युजचे शांताराम अहिरे आदींसह विविध वृत्तपत्रांचे आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने