असलोद-मंदाणा रस्त्यावर अवैद्य दारू विकणाऱ्या ढाब्यावर पोलिसांची धाड; दारुसाठा जप्त- दोघांविरुद गुन्हा दाखल





प्रतिनिधी =कृष्णा कोळी,  शहादा/ तालुक्यातील असलोद शिवारातील मंदाणा रस्त्यावर अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर असलोद दूरक्षेत्राच्या पोलिसांनी छापा टाकत सुमारे 12 हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असलोद ग्रामस्थांनी दारूबंदी व्हावी  यासाठी विविध पोलीस स्टेशन तसेच नाशिक विशेष महानिरीक्षक व विभागीय राज्य उत्पादन विभागाच्या आयुक्तना याबाबतचे निवेदन दिले होते. याची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबर रोजी प्रमोद भिलेसिंग राजपूत (वय 36, रा.असलोद ता.शहादा), व सुभाष ताराचंद पवार हे दोघे त्यांच्या मालकीचे असलोद- मंदाणा शिवारातील ढाब्यावर अवैधरीत्या दारू विक्री व बाळगतांना  मिळून आले. यात विविध कंपनीची ब्लू व्हिस्की, मॅकडॉल, डिप्लोमॅट, देशी टॅंगो आदी प्रकारची सुमारे 12 हजार रुपये किमतीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत शहादा पोलिस स्टेशनचे रमेश एम. यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी असलोद दूरक्षेत्राचे पो. कॉ. अमृत विनायक पाटील, नंदकिशोर सानप यांच्या फिर्यादीवरून प्रमोद राजपूत, सुभाष पवार या  दोघांविरुद्ध शहादा पोलिस ठाण्याअंतर्गत असलोद पोलीस दूर क्षेत्रात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस कॉ. दिपक परदेशी,पोकॉ. काळूराम चौरे करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने