-धुळ्यात युवकमित्र परिवार आयोजित 'राज्यस्तरीय'शब्दयोद्धा'वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न-
-वक्तृत्वकला ही एक उत्कृष्ट कला असून वक्तृत्वकलेच्या माध्यमातून युवकांनी कर्तृत्व व नेतृत्व करण्याची या देशाला गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र दारूबंदी चळवळीच्या नेत्या गीतांजलीताई कोळी यांनी केले.युवकमित्र परिवार आयोजित 'राज्यस्तरीय वक्तृत्व चषक स्पर्धेचे आयोजन एसएसव्हीपीएस महाविद्यालय धुळे येथे करण्यात आले होते.स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी गीतांजली कोळी बोलत होत्या.'कोविड-१९' चे शासननियम पाळत लॉकडाऊननंतर राज्यभरात प्रथमच ऑफलाईन वक्तृत्व स्पर्धा धुळे शहरात पार पडली. स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातील 60 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यावेळी कल्याण जि.ठाणे येथील युवा वक्ता यश पाटील( प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये व चषक),नाशिक येथील कु.श्रुती बोरस्ते(द्वितीय क्रमांक रोख रक्कम तीन हजार रुपये व चषक) तर पुणे येथील कु.अश्विनी टाव्हरे(तृतीय क्रमांक रोख रक्कम दोन हजार रुपये व चषक )यांनी पारितोषिक पटकावले.औरंगाबाद येथील इरफान शेख व मालेगाव येथील महेश अहिरे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
स्पर्धेचे उदघाटन धुळे येथील महाराष्ट्र माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोविंदराव तावडे यांनी केले.तर पारितोषिक वितरण कापडणे येथील कृष्णा लँड डेव्हलपर्सचे मालक महेश माळी, खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी,दारूबंदी चळवळीच्या नेत्या गीतांजलीताई कोळी,सप्तश्रुंगी महिला संस्थेच्या अध्यक्षा मिनाताई भोसले यांच्या हस्ते पार पडले.उदघाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून अंबेजोगाई येथील युवा कीर्तनकार तथा प्रसिद्ध वक्ते अविनाश भारती हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन,चाळीसगाव येथील वक्ते आकाश पाटील,प्राचार्य डॉ.एम.व्ही.पाटील,समाजकार्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष तुषार जाधव हे होते.पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथे शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा.साई महाशब्दे हे होते. पुणे येथील वक्ते प्रवीण शिंदे,धुळे येथील प्रा.सतीश अहिरे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत यशस्वी निकाल जाहीर केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसाद जगताप,रोहित ठाकूर,सागर शितोळे,प्रसाद महाले,सुयश ठाकूर यांनी परिश्रम घेतले.
Tags
news
