शिरपूर तालुकाच्या आरोग्यसेवा व आयसिडिएस विभागाचा मा.सिइओ यांना समन्वय आढावा सादर




  धुळे जि.प.मा.मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती वान्मथी सि मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली शिरपूर तालुक्यातील आरोग्यसेवेबरोबर आयसिडिएस विभागाची समन्वय सभा व मागील कालावधीच्या कामाची आढावा सभा पंचायत समिती सभागृहात दि .24/12/2020 रोजी संपन्न झाली.
 महाराष्टात दि.22 मार्च 2020 पासुन कोव्हिड 19 आजाराच्या अनुषंगाने करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागु केलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने आरोग्यविभागाचे काही राष्ट्रीय उपक्रम स्थगित झालेले होते,परंतु गेल्या दोन महिन्यांपासून कोव्हिड 19 चे निर्बंध हटविल्या नंतर सदर राष्ट्रीय कार्यक्रमाचे वार्षिक उद्दिष्ट साध्य करण्याकरिता करण्यात आलेल्या उपाययोजनेसाठी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विकासरत्न अमरिशभाई पटेल सभागृह पंचायत समिती शिरपूर येथे 1)एनआरसी 2)सिटिसि 3)प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना 4)राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम 5)जननी शिशु सुरक्षा  कार्यक्रम 6)जननी सुरक्षा योजना7)कुटुंब कल्याण शिबिर 8)बालमृत्य व मातामृत्यु आढावा  तसेच आयसिडिएस विभागाचा कुपोषण संदर्भात सॅम व मॅम बालकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सभेचे प्रास्ताविक प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राष्ट्रपाल अहिरे यांनी केले तद्नंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.संतोष नवले यांनी विषयसुची प्रमाणे कर्मचारीवर्ग यांचा आढावा सादर केला.उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय बागुल यांचीही उपस्थिती होती.
कोरोना काळात शिरपूर तालुक्यातील कर्मचारीवर्ग यांनी केलेल्या कामाचे कौतुक करुन नॉनकोव्हिड कामात काम कमी असल्याबाबत सिइओ मॅडम यांनी नाराजी व्यक्त केली.जननी सुरक्षा योजनेत सोनोग्राफी व कुटुंब कल्याण शिबिर या बाबतित काम वाढविण्याच्या सक्त सुचना मॅडमांनी दिल्यात.
 सदर सभेचे आयोजन गटविकास अधिकारी श्री.वाय.डि.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार श्री.सचिन शिंदे बालविकास प्रकल्प अधिकारी व प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारांच्या  डाॅ.राष्ट्रपाल अहिरे यांनी तालुका कार्यालय यांच्या मदतीने यशस्वी पारपाडले.
  काम कमी असलेल्या कार्यक्रमात दिलेल्या उद्दिष्ट प्रमाणे काम करण्याच्या सुचना अधिकारी वर्गानी दिल्यात व येत्या एक महिन्यात राहिलेली अपुर्ण कामे पुर्ण करुन देण्याचा विश्वास सर्व कर्मचारीवर्गानी व्यक्त केला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने