केंद्रातील कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या लढ्यास धुळे जिल्ह्यातून समर्थन शेतकऱ्यांच्या रॅलीला व आंदोलनाला पाठिंबा



धुळे प्रतिनिधी- केंद्र सरकारने केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी गेल्या 22 दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनादरम्यान 20 ते 22 शेतकऱ्यांच्या कडाक्याच्या थंडीमध्ये मृत्यूदेखील झाला आहे. तरीदेखील केंद्रातील मोदी सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप मंजूर केलेल्या नाहीत .म्हणून महाराष्ट्रातून तब्बल पाच हजार शेतकरी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक येथून दिनांक 21 डिसेंबर रोजी निघत आहे ते 22 डिसेंबर रोजी धुळे शहरात आगमन होत असल्याने या शेतकरी रॅलीचे भव्य स्वागत करण्याच्या निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान रेसिडेन्सी पार्क गुरुद्वारा शिवाजी पुतळा पाच कंदील गांधी पुतळा दत्तमंदिर नगावबारी मार्गे शिरपूर येथे सायंकाळी 6 वाजता मुक्कामी पोहोचणार आहे .
केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन कायद्यामुळे भविष्यात शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे ,शेतकरी ,शेतमजूर ,कष्टकरी गोरगरिबांवर छोट्या व्यापाऱ्यांनाही या कायद्याची जरब बसणार असून भांडवलदारांचे या कायद्यामुळे भले होणार आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी व दिल्लीकडे निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या त्याला प्रोत्साहन देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व पक्षांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय धुळे येथील झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
 सदर बैठकीत ज्येष्ठ नेते आर पी आय चे एम जी धिवरे, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम भाऊ सनेर, सरचिटणीस डॉक्टर दरबारसिंग गिरासे, उपाध्यक्ष मुकुंद  कोळवले,ज्येष्ठ पत्रकार हेमंत मदाने ,वंचित बहुजन आघाडीचे भैया पारेराव एड. नितीन वाघ, हरिश्चंद्र लोंढे विद्यार्थी आंदोलनाची योगेश जगताप,किसन काँग्रेसचे श्याम भामरे, शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील,सी तू काँग्रेस एल आर राव,पोपटराव चौधरी,मनीष दामोदर, आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ईश्वर पाटील,हमाल मापाडी संघटनेचे गंगाधर कोळेकर, वसंत पाटील, प्रशांत वाणी, विद्यार्थी संघटनेचे राकेश अहिरे, सिद्धांत बागुल, सिद्धार्थ साठे आंदोलनाचे शरद वेंधे, देवेंद्र पवार , पत्रकार प्रकाश चव्हाण उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने