आघाडीत बिगाडी, राजकीय चर्चा जोमात काँग्रेसच्या मतदारांचे क्रॉस व्होटिंग; भाजपच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय




धुळे :  राज्यातील विधानपरिषदेच्या 3 जागा साठी 1 डिसेंबरला मतदान झालं. 
यापैकी धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल देखील लागला आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश भाई पटेल हे विजयी झाले आहेत. पटेल यांची भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली होती. दरम्यान,अमरिशभाई पटेल विरोधकांची 115 मतं फोडण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपाचे 199 तर महाविकास आघाडीचे 213 मतदान केले होते. काँग्रेसच्या किमान 57 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले असून, काँग्रेसचं संख्याबळ 157 असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाली आहेत. आघाडीच्या किमान 115 मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे तर 4 मते बाद झाली आहेत. महाविकास आघाडीची 213 मते असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील.विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप पहिल्यांदाच समोरासमोर लढले आहेत. मात्र राजकीय वर्तुळात आज काँग्रेस च्या क्रॉस वोटिंग ची जोरात चर्चा असून आघाडीत बिगाडी बाबत देखील चर्चा होत आहेत. त्या मुळे पक्षाचा आदेश न पाळता क्रॉस वोटिंग करणार्यांवर काही कारवाई होते का ? या कडे आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने