शहादा येथे शिवसेना तर्फे पेट्रोल-डिझेल दरवाढी विराधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध



कृष्णा कोळी, शहादा तालुका प्रतिनिधी 
मो.9823983435

शहादा(नंदुरबार)आज रोजी पक्षप्रमुख उध्दवजी यांचा आदेशानुसार शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय बबनरावजी थोरात तसेच जिल्हा प्रमुख आदरणीय विक्रांतजी मोरे यांचा मार्गदर्शनाखाली केंद्रसरकारच्या अन्यायी कृषीकायद्याविरोधात देशव्यापी सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी शेतकरी बांधवांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पाकिस्तान, चीन पुरस्कृत  असल्याचे संबोधुन शेतकरी बांधवांचा घोर अपमान केला आहे.पर्यायाने देशातील सर्वसामान्य नागरीकांचाही घोर अपमान केला आहे.मागेही महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना साले संबोधुन शिविगाळ करण्याची मजल गेली होती.त्यामुळे ह्या मस्तवाल केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज शहादा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ तिव्र आंदोलन करुन रावसाहेब दानवे आणि केंद्रसरकारचा निषेध करण्यात आला.तसेच कोरोना महामारीत संपुर्ण देश मेटाकुटीला आला असतांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव कमी असतांनाही मोदी सरकारने ईंधनाचे दर कमी करण्याचे सोडून उलट वाढवुन भांडवलदारांचेच हित जोपासले या विरोधातही आंदोलन करण्यात आले.अन्यायी दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली.           
 याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख अरुण आप्पा चौधरी,उपजिल्हाप्रमुख सखारामजी मोते,उपजिल्हा संघटक मधुकर मिस्तरी,शहरप्रमुख रोहनकुमार माळी, ता.संघटक भगवान अलकरी, शहर संघटक गणेश चित्रकथे,ता.उपप्रमुख उत्तम पाटील, डॉ. सागर पाटील, बापू सुर्यवंशी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, माजी शहरप्रमुख बापु चौधरी, दिलिप पाटील, सुरेश मोरे,उपशहरप्रमुख गुलाब सुतार, प्रविण सैंदाने, बिपिन सोनार,ईद्रिस मेमन,उपसरपंच चुडामन पाटील, विनोद पाटील, राहुल चौधरी, नाना बिरारे,प्रशांत नायक,प्रकाश शिरसाठ, वसिम अंसारी,अशोक ईशी,विवेक भावसार,निलेश पाटील,रूषिकेश शिवदे,अक्षय वाडिले,तौसिफ खान,अशपाक काझी,राजेश भावसार, सुदाम लोहार, सतिश पाटील, लहु बागले,आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने