दिल्ली येथे सुरू असलेल्या पंजाब व हरियाणा शेतकरी मोर्चासाठी महाराष्ट्रातील किसान युवा क्रांती संघटनेचेअध्यक्ष श्री.यशवंत गोसावी आज दिल्ली येथे मोर्चाच्या समर्थनासाठी जात असताना पदाधिकाऱ्यांनी धुळ्यात त्यांचे स्वागत केले.शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन केले आहे.याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात किसान युवा क्रांती संघटनेला श्री.यशवंत गोसावी यांच्या नेतृत्वात समर्थन दर्शविले आहे.शिवाय शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने किसान युवा क्रांती संघटना यांना पाठिंबा देण्यात आला.यावेळी धुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते.त्यात प्रदेश कमेटी सदस्य अरुण पाटील.व अँड.नरेंद्र मराठे, धुळे जिल्हा संघटक प्रमोद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तेजस आप्पा गोटे, जिल्हा मीडिया प्रमुख दर्शन गोसावी, अमळनेर तालुका अध्यक्ष भूपेंद्र बडगुजर व वैभव शिसोदे, पारोळा तालुका अध्यक्ष सुनील पाटील, ढाल अध्यक्ष सुयोग पाटील कापडणे आदी उपस्थित होते.उपस्थित होते.
Tags
news
