प्रतिनिधी:- दिग्विजयसिंग राजपुत
शिंदखेडा तालुक्यातील रामी येथील रहिवासी प्रेमसिंग (पिंटू) रघुनाथ राजपुत (वय २९) यांनी दुपारी स्वतःच्या शेतात पवाराचे औषध पिऊन स्वताची जीवन यात्रा संपवली पथारे शिवारातील झिरवे रस्त्यावर असलेले आपल्या शेतात काम करत असताना पिकांना बघून जीव हा धक धक करायला लागला आणि त्या संतापात त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली पिंटू राजपुत रोज सकाळी उठल्यावर तर दिवस मावळे पर्यंत आपल्या शेतात राब राब राबत होता तरी देखील पिकांचे नुकसान झाले आणि त्या संतापत त्यांनी दुपारी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली
स्वतःच्या शेतात काम करत असताना दुपारी पिंटू गिरासे या शेतकरी ने केली आत्महत्या रामी पथारे येथील सरपंच, पोलीस पाटील दोंडाईचा पोलीस स्टेशन चे PSI दिनेश मोरे सह त्यांचे सहकारी व गावातील तरूण व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली
पिंटू गिरासे यांची घरची परिस्थिती नाजूक असल्याने ते व त्यांचे लाहन बंधू खुप मेहनत घेऊन घर चालवत होते पंरतु आज त्यांच्या कुठूंबा वर दुखाचा डोंगर खोसला आहे तरी या कुठुंबीयाना शाषण कडून मदत व्हावी अशी मागणी केली जात आहे..!
Tags
news
