शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर शहरातील शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड या बँकेतील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी तक्रार सादर केली होती .मात्र या तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी आज दिनांक 29 डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीतील ए. आर. ऑफिस समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. बोरसे यांनी आपली तक्रार मध्ये बँकेचे चेअरमन प्रसन्ना जैन व कर्मचारी संजय कुलकर्णी यांच्या गैर कारभाराबाबत चौकशीची मागणी केली होती. त्यात त्यांनी असुरक्षित कर्ज वाटप, संचालकांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्ज, व्याज न भरता दर वर्षी रीनुवल होणाऱ्या कर्ज प्रकरण, तसेच भंडारा ,गणपती ,शोभायात्रा या नावाखाली दिलेल्या देणग्या इत्यादींबाबत चौकशीची मागणी केली होती. मात्र सगळी चौकशी न झाल्यामुळे त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या इशारा दिला होता. म्हणून आज प्रहार संघटनेच्या निवडक कार्यकर्त्यांसह एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
Tags
news
