शिरपूर शहरात 31 डिसेंबर ला संचार बंदी, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई




शिरपूर - शिरपुर  शहरातील  सर्व नागरिकांना  शहर पोलीस स्टेशन यांच्या कडून जाहीर सूचना देण्यात आली आहे की, शिरपूर शहरात 31 डिसेंबर ला संचार बंदी लागू करण्यात आली असून या काळात नियमांचे उल्लंघन केल्यास  कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.
मा.जिल्हाधिकारी सो धुळे यांचे कडील आदेश नुसार दि. 31/12/2020 रोजी रात्री 10.00 वाजेपासुन ते स.05.00 वाजेपर्यंत संचारबंदी चे  आदेश दिले असुन तरी सर्व नागरिकांनी नविन वर्षाचे स्वागत किंवा सेलिब्रेशन हे आपल्या घरीच करावे कुणीही नागरिक किंवा व्यक्ती हे 31 डिसेंबर च्या रात्री 10.00 वाजेनंतर कोणीही रस्त्यावर विनाकारण फिरणार नाही तसेच सेलिब्रेशन करणार नाही.जो कोणी व्यक्ती आदेशाचे उल्लंघन करील त्याच्या विरुद्ध  कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा शिरपुर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिला आहे.


      
    

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने