शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यात ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून दिनांक 27 डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाले आहे. यात आज दिनांक 29 डिसेंबर रोजी शिरपूर तालुक्यात होऊ घातलेल्या 34 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी 204 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.यात हिंगोनी बु. 7, शिंगावे 21 ,कळमसरे 01,साकवद 04, मांडळ 7, गरताड 6 , ऊपर पिंड 7 ,सावळदे 10 ,असली तांडे 7 ,भटाने 3, वरुड 9 , जुने भामपुर 16, विखरण 25, होळ 22, भाटपुरा 10, नटवाडे 4, दहिवद 9 ,बाळदे 8, टेकवाडे 15,जातोडे 13 असे नाम निर्देशन पत्रांचा समावेश आहे. तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींपैकी आज केवळ 20 ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन पत्र दाखल झाले असून तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींसाठी आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. अनेक उमेदवारांची कागदपत्रांची पूर्तता नसल्याने आज नामनिर्देशनपत्र दाखल होऊ शकले नाहीत. त्यामुळे उद्या मोठ्या संख्येने नामनिर्देशनपत्र दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात शासनाने काही नियम शिथिल केले असून उद्यापासून ऑफलाइन पद्धतीने देखील नामनिर्देशन पत्र दाखल केले जाणार असून उमेदवारांची जुने बँक खाते देखील ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची नामनिर्देशन पत्र उद्या सायंकाळपर्यंत दाखल होणार आहेत.
Tags
news
