धुळे प्रतिनिधी - युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र धुळे तर्फे राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2021 सहभागी निवड हेतू जिल्हा युवा संसद आयोजित करण्यात येत आहे. राज्यस्तरीय युवा संसद मध्ये विजेता घोषित स्पर्धा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019 मध्ये सहभागी होणार असून राष्ट्रीय स्तरीय युवा संसद महोत्सवामध्ये प्रथम विजेत्याला दोन लाख ,द्वितीय विजेत्याला एक लाख पन्नास हजार आणि तृतीय विजेत्याला एक लाख रुपये पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय युवा संसद मध्ये भाषेचे माध्यम हिंदी ,इंग्रजी, आणि मराठी असेल, राष्ट्रीय स्तरावर भाषेचे माध्यम हिंदी किंवा इंग्रजी असेल ,जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धा ही ऑनलाईन होणार असून सहभागी स्पर्धकांसाठी चर्चेसाठी चार मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांचे वय 18 ते 25 असावे (युवक/ युवती,) दरम्यान इच्छुक सहभागी स्पर्धकांनी आपले कागदपत्र चालक परवाना ,मतदान ओळखपत्र आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र ,जन्मतारिख प्रमाणपत्र, पासपोर्टच्या साईज फोटो जमा करावेत .अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 26 डिसेंबर 2020 असून कार्यालयाच्या पत्ता नेहरु युवा केंद्र प्लॉट नंबर 6 पंकज बिल्डींग आनंद नगर इंदिरा गार्डन जवळ देवपूर धुळे असा आहे अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02562 22 65 27 संपर्क साधावा असे आवाहन अशोक कुमार जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहेत
Tags
news
