नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून .
नाशिक-: नाशिक येथे कनकुटे जनजागरण सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने इंदिरा नगर पाथर्डी रोड नाशिक येथे संविधान दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने नागरिकांना भारतीय संविधानाचे अद्यावत प्रतिचे तसेच युवकांना टी-शर्ट चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे होते..
तर प्रमुख वक्ते भाजप प्रदेश नेते तथा प्रवक्ते लोकनेते प्रा.सुहासजी फरांदे सर होते.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी संविधानाचे महत्त्व व अधिकार ह्या विषयी नागरिकांना माहिती दिली.
ह्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडी राज्य नेते समाजभूषण बाळासाहेब शिंदे ,नगरसेवक भगवानजी दोंदे, रिपाई जेष्ठ नेते दिपकभाई ननावरे,नगरसेवक ऍड.श्यामभाऊ बडोदे, माजी नगरसेवक देवानंद बिरारी, अन्याय अत्याचार कृती समितीचे मुख्य निमंत्रक राहुलजी तुपलोंढे,सामाजिक कार्यकर्ते प्रमोदभाऊ पगारे,साहेबराव आव्हाड,युवा नेते प्रशांत गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते किरण (नाना) दोंदे आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कनकुटे यांनी केले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रणिता दोंदे, किरण दोंदे, प्रसाद कनकुटे, उत्तम कनकुटे, मीरा कनकुटे, शितल कनकुटे, गौतम गोंटे, अंजु मराठे, संगीता कुमावत, सिदर्थ त्रिभुवन, सागर खंडारे, जयश्री गायकवाड, तुषार पटेकर, ज्ञानेश्वर तूपसुंदरे, बंडू सावंत, अनिल ढाले, प्रतीक गोंटे, इत्यादी परिश्रम घेतले
सुत्रसंचालन युवा नेते नवीनभाऊ ननावरे व विक्रांतभाऊ गांगुर्डे यांनी केले.
Tags
news
