शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मध्ये उल्लेख




आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकप्रिय कार्यक्रम मन की बात मध्ये शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उल्लेख केला आहे. शिरपूर तालुक्यातील भटाने येथील शेतकरी जितेंद्र कथु भोई यांनी आपला मका पिकाचा शेतमाल हा मध्य प्रदेशातील सेंदवा येथे जाऊन व्यापारास विक्री केला होता. मात्र सदर व्यापाऱ्याने मालाचे पैसे देण्यासाठी वारंवार टाळाटाळ केल्यामुळे यांनी या याची तक्रार उपविभागीय अधिकारी सेंधवा मध्यप्रदेश यांच्याकडे केली होती .या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी सदर व्यापारास शेतकऱ्याचे पैसे तात्काळ देण्याबाबत आदेश केला होता या नंतर त्या व्यापाऱ्याने दोन टप्प्यात शेतकऱ्यांचे पैसे परत केले. मात्र गावातील ज्या दलालांच्या मार्फत हा माल विक्री केला होता त्या दलालांनी सदर शेतकऱ्यास बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी दिनांक 17 रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. यात शेतकऱ्यांच्या उल्लेख आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात केला आहे व शेतकऱ्यांना संदेश दिला आहे की केंद्र सरकारने तयार केलेले नवीन कृषीविषयक या कायद्यान्वये शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार करून आपले कृषी मूल्य परत मिळवले आहे  आपण ही जागृत राहून नवीन कृषी कायदयचा उपयोग करा असे आवाहन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने