शिरपूर तालुक्यात पुलाचे तुटलेले कठडे नविन बनवावे- भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी









*शिरपूर-*: शहराजवळील दोन तर राज्य महामार्ग शिरपूर-शहादा महामार्गावर अनेक ठिकाणी पुलांवरील कठडे, सुरक्षित गार्ड तुटलेले असल्याने वाहन धारकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील बहुतांशी लहान पुलांवर कठडेच बसविलेले नसल्यामुळे अनेकदा अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत शिरपूर शहरालगत असलेल्या आमोदे गावाकडे जाणारा रस्त्यावरील अरुणावती नदीवर लहान पूल बांधण्यात आला आहे. जेव्हा-जेव्हा या नदीला महापूर आला त्या- त्यावेळी या पूलाचे कठडे वाहून गेले आहेत. गेल्या वर्षी देखील या नदीला महापूर आल्या मुळे कठडे वाहून गेले आहेत तेव्हापासून या पूलावर वाहून गेलेले कठडे नव्याने बसविण्यात आलेले नाहीत मात्र याच पूलाशेजारी मोठा पूल असल्यामुळे त्या पूलावरुन देखील अधिक वर्दळ असते. असे असले तरी या लहान पूलावरुन देखील नेहमीच वाहनांची वर्दळ असते तसेच शहरातील खंडेराव मंदिराजवळील अरुणावती नदीवर उंटावद गावाकडे जाणाऱ्या पूलाचे देखील कठडे महापूरामुळे वाहून गेलेले आहेत. पुलावर नविन कठडे  बनविण्यात यावे यासाठी माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा मार्गदर्शनाखाली भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी कार्यकारी अभियंता रोहयो बांधकाम विभाग धुळे यांचाकडे मागणीचे निवेदन (दि.८आॅक्टो) रोजी दिले. यावेळी भाजपा शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोरसे, भाजपा मा. तालुका उपाध्यक्ष अनिल गुजर उपस्थित होते. निवेदनाची प्रत राज्याचे बांधकाममंत्री ना. अशोक चव्हाण, पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार, उपविभागीय अभियंता, १,२,३ शिरपूर यांना हि पाठवण्यात आल्या आहेत. अश्याच प्रकारे पुन्हा बाळदे गावाजवळ तिसरा पूल बांधण्यात आलेला आहे याही पूलाची परिस्थिती तशीच आहे. गेल्या वर्षी नदी-नाल्यांना आलेल्या महापूरामुळे बहुतांशी ग्रामीण भागातील पुलाचा भराव, पुलाचे कठडे वाहून गेले तर रस्त्यांचे डांबरीकरण उखडून गेल्यामुळे त्या रस्त्यावर ये-जा करणे धोकेदायक ठरू लागले आहे. वाघाडी, अर्थे, विखरण, त-हाडी गावाजवळील पूल तुटलेले आहेत त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना ते धोकेदायक ठरु लागले आहेत. तसेच जोयदा, सांगवी, बुडकी गावा जवळील पुलाचे कठडे वाहून गेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतुक करणाऱ्या वाहनांना जिकरीचे ठरत आहे. अर्धवट असलेल्या पुलावर लोखंडी संरक्षण पाईप लावण्याची गरज आहे तसेच पुलाच्या बाजूलाच पावसामुळे लहान झाडाझुडपामुळे वाहन चालकांना अंदाज चुकून वाहन पुलाखाली कोसळण्याची शक्यता असल्याचे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे कि या पुलावरील झाडे झुडपांची देखील साफसफाई केल्यास वाहनधारकांना पुलाचा अंदाज लक्षात येण्यास मदत होवून अपघात होण्यापासून वाचवू शकेल. सुळे ते खामखेडा दरम्यान मोजकेच पूल असले तरी त्याची अवस्था बिकट आहे. सायकलस्वार वा दुचाकीस्वार अनेकदा पूलावरून खाली पडल्याने जखमी झाले आहेत. तरी याकडे गांभीर्याने लक्ष देवून पुलावर कठडे बांधण्यात यावेत अशी हि मागणी  भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने