अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींने “बेगम हजरत महल शिष्यवृत्तीचा” लाभ घ्यावा- सिकंदर भैय्या शेख




उदगीर (प्रतिनिधी)  राहुल शिवणे
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय मान्यताप्राप्त मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन द्वारे अल्पसंख्यांक समाजातील मुलींना “बेगम हजरत महल शिष्यवृत्ती” साठी ऑनलाइन अर्ज मागवणे सुरु आहे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींने या शिष्यवृत्ती चा लाभ घ्यावा असे आव्हान राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे मा.शहर संघटक सिकंदर शेख यांनी केले आहे..
दरम्यान या शिष्यवृत्तीचा लाभ,
मुस्लिम,बौद्ध,शीख,पारशी,जैन व इसाई या अल्पसंख्यांक समाजातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून बेगम हजरत महल शिष्यवृत्ती दिली जाते. इ. ९ वी ते १२ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतगर्त ९ वी व १० वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना वार्षिक ५००० रुपये तसेच इ. ११ वी व १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ६००० रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवणे सुरु आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख “३१ ऑक्टोबर २०२०” आहे. अर्ज दाखल करण्यासाठी http://bhmnsmaef.org/maefwebsite/ या संकेतस्थळावर भेट द्या किंवा आपल्या शाळेच्या मुख्याधिपकांशी संपर्क साधा. अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आव्हान सिकंदर शेख यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने