सात्रळ /प्रतिनिधी
-दि १५ डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या ८९ व्या जयंतीनिमित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,सात्रळ येथे कोविड १९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे काही निर्बंधांमुळे वाचन प्रेरणा दिन ऑनलाईन पद्धतीनेसुरक्षित अंतर व नियमांचे पालन करून घेण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व ग्रंथालयात डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्यावरील ग्रंथांचा स्वतंत्र विभाग स्थापन करून महाविद्यालयात उपस्थित प्राध्यापकांना सर्व उपलब्ध ग्रंथांची माहिती देण्यात आली. विद्यार्थांसाठी ऑनलाईन लेक्चर्स मराठी विभागाकडून घेण्यात आले सदर कार्यक्रमाचा मुख्य हेतू हा वाचन प्रेरणा दिनातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करणे आहे त्यामुळे विद्यार्थांना व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल तर वाचनातून आत्मविश्वास निर्माण करायला हवा आत्मविश्वास आला तर व्यक्तिमत्वा बरोबरच आपले कोणतेही स्वप्न पूर्ण करणे शक्य होते असे विचार महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर व उपप्राचार्य प्रा.घोलप डी.एन. तसेच मराठी विभाग प्रमुख डॉ.वाडीतके जी के यांनी मांडले. तसेच महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.पवार ए.बी. यांनी पायरेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बिसिनेस मॅनेजमेंट अॅड अॅडमीनीस्टेशन (आय.बी.एम.ए.) लोणी या महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी ऑनलाईन लेक्चर्स घेतले व विद्यार्थांना वाचनाचे महत्व सांगून विद्यार्थांना महाविद्यालय ग्रंथालयातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील व प्रेरणादायी असे उपलब्ध असलेले ग्रंथ वाचावेत व स्वतःचा विकास करावा असे विचार मांडले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर व उपप्राचार्य प्रा.घोलप डी.एन. तसेच मराठी विभाग प्रमुख डॉ.वाडीतके जी के, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर सेवक हजर होते कार्यक्रमाचे आयोजन प्रा.श्रीमती कार्ले सि.एस.यांनी केले प्रास्तविक ग्रंथपाल डॉ.पवार ए. बी . व विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. घाणे डी .एन . यांनी केले
Tags
news
