शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ.व्ही व्ही रंधे इंग्लिश मिडियम स्कूल येथे भारतरत्न डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिवस ऑनलाईन पद्धतीने झूम अॅप वर साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने विद्यालयाचे उपशिक्षक विशाल सोनगडे यांनी 21व्या शतकात सोशल मीडियाच्या जास्त आहारी न जाता शालेय जीवनात प्रेरणादायी साहित्याचे वाचन केले पाहिजे. तसेच विद्यालयाच्या प्राचार्या यांनी आजच्या परिस्थितीत मुलांना प्रेरणा मिळावी या अनुषंगाने 'आईचे डोळे' या कथेचे प्रकट वाचन केले.यावेळी जवळजवळ 192 विद्यार्थी या ऑनलाईन वाचन प्रेरणा दिवस कार्यक्रमात उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाच्या उपशिक्षिका शितल चव्हाण, रिदवाना शेख, ममता पाटील यांनी डॉ.अब्दुल कलाम यांची प्रतिकृती भव्य रंगोळीतून साकारली व फलक लेखन ज्योती देशमुख ,सुरेखा चौधरी ,मनीषा पटेल यांनी केले. याप्रसंगी ऍडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर प्रमोद पाटील प्राचार्य कामिनी पाटील मनीषा पाटील, रमाकांती विश्वकर्मा छाया पाटील ,मनीषा लोखंडे ,उमेश राजपूत, समाधान राजपूत आदी उपस्थित होते.
Tags
news
