माजी मंत्री अमरिशभाई पटेल व जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांच्या प्रयत्नाने नवीन रस्त्यांना २४.३७ कोटी निधी मंजूर




 

शिरपूर वार्ताहर- शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणावर होत्या.पावसाळ्यात शेतकरी बांधवांना आपल्या शेती पर्यंत बी-बियाणे,खत तसेच आलेले उत्पन्न बाजारपेठे पर्यंत दळणवळणाकरीता मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या,या सर्व समस्यांचा मागोवा घेत माजी मंत्री  अमरिशभाई पटेल व जिल्हा  परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांनी रस्त्यांचे दुर अवस्थांचे चित्रण शासनाच्या  निदर्शनास आणून दिले  व वेळोवेळी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र यांच्याशी पाठपुरावा करून शिरपूर तालुक्यातील अर्थे भरवाडे ते टेम्भे  रस्ता ३.५५ कोटी  एस एच १२-ते पाथर्डे ते बाळदे रस्ता  १.९७ कोटी गोदी ते थाळनेर रस्ता ५.९९ कोटी   एम डी आर १२ ते अजनाड रस्ता २.७४ कोटी    ओ डी आर ३८ (चांदसे) ते वाडी रस्ता १.३९ कोटी   विखरण ते भामपूर रस्ता ३.९१ कोटी   एन एच ३-  ते पिंपरी आढे रस्ता १.२० कोटी   हाडाखेड ते हिंगोणीलौकी रस्ता ३.६२ कोटी हे नवीन रस्ते मंजूर केलेत यासाठी नंदुरबार लोकसभा खासदार डॉ हीना गावित शिरपूर आमदार काशीराम पावरा यांचे सहकार्य लाभले.  

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने