दोंडाईचा (प्रतिनिधी) : दरवर्षी श्रीगणेशोत्सव दोंडाईचा शहरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा शहरातील गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तसेच श्रीगणेश मुर्त्यांचे विसर्जन देखील अप्पर तहसीलदार यांच्या मनमानी दादागिरीमुळे आणी दोंडाईचा नगरपालिकेच्या आदेशानुसार कृत्रिम तलावात करण्यात आले किंवा त्या मुर्त्या नगरपालिकेस विसर्जन करण्यासाठी सुपुर्द करण्यात आल्या. दोंडाईचा शहरातील नागरिकांनी व गणेशभक्तांनी देखील फार मोठ मन दाखवत यांस सहकार्य केले.
परंतु दि.०४/०९/२०२० रोजी पहिल्या प्रहरी रात्री १-२ वाजेच्या सुमारास नाशिक येथील व्यापारी आयशर गाडीत गणपती बाप्पाच्या मुर्त्या भरुन नेत असल्याचे काही गणेशभक्तांना समजले. या व्यापाऱ्याशी बोलले असता त्याने मुर्त्या विकत घेतल्या असल्याचे सांगीतले. श्रीगणेश भक्तांनी तात्काळ शिवसेनेचे शैलेश सोनार आणी चेतन राजपूत यांना संपर्क केला. रात्री घटनास्थळी तात्काळ पोहचुन शिवसैनिक आणी श्रीगणेशभक्तांनी नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी यांना संपर्क साधुन सदर विषयासंदर्भात विचारणा केली व मुर्त्या भरलेली गाडी थांबविण्यास सांगीतले.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. प्रवीण निकम यांनी आज दि.०४/०९/२०२० ऱोजी सकाळी ११.०० वाजेला नगरपालिकेत घेतलेल्या बैठकीमधे उपनगराध्यक्ष रवी उपाध्ये, एपीआय राठोड, एपीआय लोले, पीएसआय पाटील प्रशासनातर्फे उपस्थित होते. यावेळी शिवसेनेसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सदर घटनेचा अत्यंत तीव्र निषेध नोंदविला. हिंदु बांधवांच्या, श्रीगणेशभक्तांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या, अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे केली. एकीकडे भाजपा हिंदुत्वाच्या वल्गना करते तसेच दुसरीकडे हिंदुंचे आराध्य परस्पर रातोरात विक्रीस काढते या घटनेचा शिवसेना दोंडाईचा शहराच्या वतीने तीव्र निषेध केला. त्यासह सदर मुर्त्यांचे विधीवत विसर्जन करण्याची मागणी केली.
यावेळी शिवसैनिक आणि श्रीगणेशभक्तांच्या तीव्र भावना पाहुन सहाय्यक पोलिस निरीक्षक व दोंडाईचा पोलिस स्टेशनचे प्रभारी श्री. राठोड यांनी प्रसंगावधान राखुन श्रीगणेशभक्त व शिवसैनिक यांची श्रीगणेशाच्या मुर्त्या विसर्जीत करण्याची मागणी मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी मान्य केल्याचे जाहीर करुन तात्काळ श्रीगणेश मुर्त्यांचे विधीवत विसर्जन पोलिस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन आणी सर्व शिवसैनिक यांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे विभागीय तालुकाप्रमुख कल्याण बागल, शिवसेना शहरप्रमुख चेतन राजपूत, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड.एकनाथ भावसार, शिवसेना संघटक राकासेठ, सामाजिक कार्यकर्ते सुहास साठे, उपशहर प्रमुख विजय वाडीले, दीपक मराठे, आबा चित्ते, राकेश पेटकर, किशोर भोई, भरत भोई, राज भोई, शिवसेना सोशल मिडीया सेलचे देवेंद्र अहिरे, निलेश विसावे, राष्ट्रवादीचे राजू देशमुख, आबा महाजन, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मयुर पाटील, आकाश महाजन तसेच शिवसेना आणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणी दोंडाईचा शहरातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
