नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने सेवा सप्ताह म्हणून सरस्वती शिशु वाटिका येथे वृक्षारोपण करण्यात आले




शहादा :- भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा आदिवासी मोर्चा यांचा तर्फे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने सेवा सप्ताह म्हणून सरस्वती शिशु वाटिका येथे वृक्षारोपण करण्यात आले या वेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ चौधरी, शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार राजेश दादा पाडवी, प्रदेश सदस्य राजेंद्रजी गावित, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील सर, जिल्हा संघटक सरचिटणीस निलेश माळी, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, ईश्वर पाटील, शहर अध्यक्ष विनोद जैन, चेअरमन डॉ वसत पाटील, आदिवासी मोर्चा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांतजी वसावे, महिला जिल्हा अध्यक्ष किन्नरी सोनार, किसान मोर्चा प्रदेश सदस्य डॉ किशोर पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन देवरे,अदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष सामरसिंग पावरा, शहर अध्यक्ष झुलाल मालचे, सरचिटणीस सुखलाल रावताळे, व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी जिला अध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले नरेंद्र जी मोदी देशासाठी तळमळीने काम करत आहेत त्यांचा कार्याने प्रभावी होत तरुन वर्ग आज भारतीय जनता पार्टी सहभागी होत आहेत देश हिताचे निर्णय घेतले आहेत. तसेच आमदार राजेश पाडवी साहेब बोलले की सर्व कार्यकर्तानी मोदी साहेब चा वाढदिवस सेवा सप्ताहाचा माध्यमातून गरीब व गरजु लोकांची सेवा कार्य होत आहे. आपण मोठ्या संख्येने रक्तदान शिबिर आयोजित केले वृक्षारोपण केले गरजु लोकांना चष्मे उपलब्ध करून दिले गरीब महिलांना साडी वाटप केले असेच सेवा कार्य करत राहावे तुम्हाला कधी गरज वाटेल तेव्हा सांगा आम्ही मदती साठी तयार आहोत. या वेळी भाजपा अदिवासी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने