तोंदे गावाजवळ शिरपूर पॅटर्न २४३ व्या बंधाराचे भूमिपूजन.





शिरपूर - तालुक्यातील तोंदे गावाजवळ आ. काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या हस्ते शिरपूर पॅटर्नअंतर्गत २४३ व्या बंधाराचे तसेच एकूण ३ बंधारे भूमिपूजन करण्यात आले.

धुळे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभाग अंतर्गत शिरपूर पॅटर्न पुनर्भरण बंधारा भूमिपूजन शनिवारी दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता झाले.यावेळी आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, जिल्हा परिषद सदस्या बेबीबाई पावरा, कुटवाल पावरा,
शिरपूर शेतकरी साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, माजी पंचायत समिती उपसभापती संजय पाटील, तोंदे सरपंच संतोष अहिरे, अनिल गुजर तोंदे, शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, लघुसिंचन विभागाचे उपविभागीय जलसिंचन अधिकारी हितेश भाटूरकर, शिरपूर पॅटर्नचे अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ व्यक्ती शिवाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष देविदास श्रीराव, राजेंद्र कोळी, संतोष जाधव, संतोष परदेशी हिसाळे, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, संतोष माळी, विनायक कोळी, पंचक्रोशीतील पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

आमदार काशीराम पावरा म्हणाले, माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने शिरपूर तालुक्यात शिरपूर पॅटर्न चे काम यशस्वीपणे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुरू आहे. विविध क्षेत्रात पटेल परिवाराचे योगदान अनमोल व अतुलनीय आहे. सर्व शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी भाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल म्हणाले की, माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या अथक परिश्रमातून व दूरदृष्टीने तालुक्यातील सर्वच भागात शिरपूर पॅटर्न अंतर्गत बंधारे बांधले जात असून पाण्याची उपलब्धता व पाण्याची मुबलकता निर्माण करणे हेच ध्येय साध्य करायचे आहे. अजूनही परिसरात पाण्याचे काम सुरुच राहणार असून शेतकरी बांधव यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

माजी मंत्री अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिरपूर पॅटर्नचे काम सातत्याने व नियमितपणे सुरू ठेवले आहे. शिरपूर तालुक्यात आतापर्यंत २४० शिरपूर पॅटर्न बंधारे चे काम पूर्ण झाले आहेत. शिरपूर तालुक्यातील बऱ्याचशा भागात जमिनीत भूगर्भातील पाण्याची पातळी निश्चितच वाढली आहे. अनेक ठिकाणी मुबलक जलसाठा निर्माण झाला असून तालुक्यातील उर्वरित भागात देखील टप्प्याटप्प्याने शिरपूर पॅटर्न अंतर्गत बंधारे बांधले जात आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने