शिवाजी महाराज यांच्या नावाने बिडी या उत्पनाचे नाव बदल करा - शिवछत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र ,शिरपूर संघाची मागणी




शिरपूर - शिवछत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने  पोलीस निरीक्षक शिरपूर पोलीस स्टेशन याना आज रोजी निवेदन देण्यात आले आहे . छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने बिडी या उत्पनाचे नाव बदलणे बाबत तसेच संबंधी मालकाविरुद्ध योग्य ती कार्यवाही होणेबाबत निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज या अखंड महाराष्ट्राचे आद्य पुरुष आहेत त्यांची ख्याती जगद्विख्यात आहे छत्रपती संभाजी महाराज हे फक्त योद्धेच नाही तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार आहेत. तसेच उत्कृष्ट लेखक देखील होते अशा प्रेरणादायी कारकीर्द महामानवाचे नाव धूम्रपान करण्याचे एक साधन असलेली बिडी याचं नाव घेऊन सगळ्या कंपनी मालक हे महाशय तमाम महाराष्ट्रातील युवकांना आकर्षित करून आपला व्यवसाय वाढवत आहे परंतु या महाशयांनी महाराष्ट्रातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला आहे तसे महाराष्ट्रातील राज्यातील तमाम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तरी आपण छत्रपती संभाजी महाराजांचे नाव वापरून धूम्रपान करण्याचे साधन करण्याची विधी उत्पादन करणाऱ्या कंपनी मालकाविरुद्ध योग्य ती कारवाई करावी या आशयाचे  निवेदन दिले आहे. शिवछत्रपती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवधर्म फाउंडेशन हे पुरंदर येथे आमरण उपोषण करीत आहे यांना संपूर्ण पाणी पाठिंबा देत आहे निवेदन देण्यास वेळेस तालुका अध्यक्ष कृष्णा पाटील तालुका उपाध्यक्ष चेतन राजपूत तालुका ग्रामीण अध्यक्ष आशिष पाटील ,जिल्हा संपर्कप्रमुख आप्पा मराठे तालुका संपर्क प्रमुख अमोल बागुल शिरपूर तालुका कार्याध्यक्ष आनंद पाटील हे सगळे  पदाधिकारी हजर होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने