शहादा (प्रतिनिधी) :- आदिवासी कोळी समाज समन्वय समिती च्या खांदेश विभाग उपाध्यक्ष पदी रविभाऊ शिरसाठ यांची निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र मुख्य समन्वयक मा अँड् शरदचंद्र जाधव साहेब यांनी दिले. रविभाऊ शिरसाठ यांनी धुळे जिल्हा समन्वयक असताना अनेक उपोषण, निवेदन, सामाजिक उपक्रम तसेच जनजागृती चे कामे केलेले आहेत. त्याच्या ह्याच कार्याची दखल घेऊन त्यांना खांदेश विभाग उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. या जबाबदारी च्या माध्यमातून अजुन खुप सामाजिक कार्य, करण्याचे मनोदय रविभाऊ शिरसाठ यांनी व्यक्त केला आहे..
रविभाऊ शिरसाठ यांच्या निवडीबद्दल विविध स्थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याच बरोबर श्रीराव आकोसकर पुणे, एस.एस.बिराडे औरंगाबाद, विजेंद्र इंगळे औरंगाबाद, महेंद्र चौगले कोकण विभाग, किसन सोनवणे नाशिक विभाग, सुरेश गायकवाड सातारा विभाग, ठोंबरे साहेब मुंबई, अँड् अनिल नन्नावरे जळगाव, दिलीप बागुल धुळे, गिरधर आप्पा महाले धुळे, गीतांजली ताई कोळी धुळे, कल्पनाताई बोरसे शिरपूर, सोनालीताई अखडमल शिरपूर, जयश्री ताई शिरसाठ जातोडा ,वैशाली ताई महाले शिरपुर, कविता मोरे चाळीसगाव, सुकलाल बापु शिरसाठ नंदुरबार, हिरालाल वाकडे शिरपूर, मदन काका शिरसाठ जळगाव, रविंद्र चव्हाण पत्रकार दै.जनशक्ती नंदुरबार, कल्पेश राजपूत पत्रकार दैनिक पोलीस शोध, राकेश कुवर पत्रकार दै.देशोन्नती बामखेडा, गणेश कुवर ए.डी.वृत्तवाहिनी रिपोर्टर सारंगखेडा,विनोद शिंदे पत्रकार दैनिक लोकमत, कृष्णा कोळी एम.डी.वृत्तवाहिनी शहादा, यांनी रविभाऊ शिरसाठ यांचे निवडी बद्दल स्वागत केले आहे
Tags
news
