महाराष्ट्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी






मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीनं एक महत्वाच्या निर्णय घेतला आहे.
हाती आलेल्या  वृत्तानूसार, राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी घातली आहे. यापुढे सिगारेट व बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट आणि बिडी बंडल विकत घ्यावे लागणार आहे.




व्यसनांकडे वळलेल्या तरुणाईला रोखण्यासाठी हा आदेश काढल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच या आदेशाची कठोर अंमजबजावणी करण्याचे आदेश देखील सरकारने पोलीस आणि महापालिकेला दिले आहे.

सिगारेट पाकिट अथवा बिडी बंडलाची विक्री केल्यास कायद्यात अपेक्षित असलेला उद्देश म्हणजे 'आरोग्याच्या धोक्याची कल्पना' हा साध्य होतो. मात्र तेच सुटी म्हणजे सिगारेटच्या पाकिटातून एकेक सिगारेट काढून विकल्यास ग्राहकाला धोक्याची कल्पना कायद्याच्या अर्थाप्रमाणे मिळत नाही. आरोग्य विभागाचे हे म्हणणे विधी व न्याय विभागाने आता करोनाच्या पार्श्वभूमीवर मान्य केले असल्याची माहिती देण्यात आली आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने