तालुका कृषी कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षाचा कृषी अधिकारी कार्यालयात राडा पिके तालुका कृषी अधिकारी यांच्या टेबलावर ठेऊन बतसेच कार्यालयाच्या आवारात सडलेली पिकांची रोपे फेकून निषेध.



                              
           शिरपूर - तालुक्यात गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली असून.तालुक्यातील सर्व  भागातील नदी,नाले,जलाशये व सिंचन प्रकल्प काही प्रमाणात भरून नद्यांनी प्रवाहाचा वेग धरला आहे.कमी जास्त प्रमाणात होत असलेल्या पावसाने ऊन सावलीचा खेळ सुरू असून,पिके पिवळी पडून धोक्यात आली असून तालुक्यात अतीवृष्टीने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून.यावर्षी तालुक्यात काही भागात जास्त पावसामुळे मुख्य पीक असलेले मुग,उडीद,कापूस ही पीके हातची गेली आहेत. आधीच शेतकरी करोनाचा आस्मानी संकटामुळे प्रचंड अडचणीत आला असता त्याला अतीवृष्टीचा सामना करावा लागल्याने हे सुल्तानी संकट ओढवले आहे.कोरोना काळात शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. पीकांवर आशा होती पाऊसही सुरवातीला चांगला झाला नंतर अतीवृष्टीने पीके सडू लागली.सरकार घोषणा करते,परंतु अजूनही बँकांच्या धोरणामुळे शेतकन्याला पीक कर्ज उपलब्ध होत नाही.
               या वर्षातील जून जुलै महिने पूर्णपणे कोरडा गेल्याने शेतकऱ्यांनी रिमझिम पावसाच्या ओलीवर पेरण्या केल्या होत्या;परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावून वार्षिक सरासरीपेक्षा उच्चांक गाठला.मागील दहा बारा दिवसांमध्ये सतत पावसाची हजेरी सुरू होती.अश्यातच पावसाचे प्रमाण वाढल्याने ठिकठिकाणी "शेतांमध्ये पाणी साचले असून,खरीप पिके पिवळी पडत असून मूग पिकाच्या सेंगा झाडावरचं सडायाला लागले आहेत तसेच शेंगांना झाडावरचं कोंब निघायला लागलेत दिवसेंदिवस सूर्यदर्शन होत नसल्याने व अधिकच्या पावसामुळे मूग,उडीद,चवळी,आदी कडधान्य व भाजीपाला पिके पिवळी पडून वाया जावू लागली अश्यातच पैशांची जुगाड करतांना मित्र नातेवाईक एवढेच काय सावकरांकडून अव्वाच्या सव्वा दराने उद्याच्या पीकाच्या आशेवर पैसा शेतकऱ्याने घेतला आहे,
                                शेतीतील नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी.जेणेकरून खरिपाचे झालेले प्रचंड नुकसान शेतकरी रव्बी पीकांमधून जसे जमेल तेवढे भरून काढण्याचा प्रयत्न करतील, पण त्यासाठी रव्बी पेरणी आधीच त्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी प्रहार जनशक्तीची मागणी आहे.नुकसानीचे पंचनामे तात्काळ न झाल्यास कृषी कार्यालयातील कृषी अधिकाऱ्यांसह सर्व मंडळ अधिकाऱ्यांना काळे फासल्याशिवाय प्रहार संघटना राहणार याची नोंद गांभीर्याने घ्यावी.असा सूचक ईशारा व प्रहार जनशक्ती पक्ष शिरपूर यांच्या वतीने देण्यात आला.याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे,विजय कोळी, स्वप्निल राजपूत,नितीन जाधव,निलेश कोळी, मनोज राजपूत,मुकेश पाटील,महेंद्र पाटील, योगेश माळी, प्रमोद बडगुजर,किशोर बोरसे,नाना माळी आदी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने