चार तासात घरफोडीचा गुन्हा उघड, स्थानिक गुन्हे शाखा व देवपूर पोलिसांची कारवाई

 


 धुळे प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यातील  स्थानिक गुन्हे शाखा व देवपूर पोलिसांची संयुक्त कारवाईत अवघ्या चार तासात घरफोडीच्या गुन्हा उघड करण्यात यशआले आहे .
 याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 29 सप्टेंबर रोजी चेतन कुमार कोळी बृहमुंबई शाखा यांनी देवपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती त्यानुसार वडील गंभीर स्थितीत आजारी असल्याने परिवारासह धुळे येथे आले होते व बंदोबस्त करता देण्यात आलेले सरकारी रीव्हलव्हर व  जिवंत काडतूस हे आपल्या बहिणीच्या घरी किरण हौसिंग सोसायटी झेंडा चौक धुळे येथे बॅग ठेवली होती. मात्र ही बॅग  दिनांक 28 रोजी ती बॅग तपासले असता त्यामध्ये ठेवलेले रिवाल्वर ,राउंड,मंगळसूत्र व रोख रक्कम असे एकूण 1 लाख 76 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला होता नव्हता .घरात सर्वांना विचारपूस केल्यानंतर सदर वस्तू चोरीस गेल्याची खात्री झाल्यावर  देवपूर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांचा विरोधात भादवी कलम 454, 457 ,380 प्रमाणे  गुन्हा दाखल केला होता.
 सदर गुन्ह्याच्या बाबतीत  धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक सो यांनी तात्काळ दखल घेऊन देवपूर पोलिस स्टेशनचे  व स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी  यांना याबाबत तपासाच्या सूचना दिल्या होत्या .त्यानुसार संयुक्त पथकाने सदरचा तपास करत असताना आरोपी भरत सुरेश चौधरी रा,.मनमाड जीन नाल्या जवळ मालेगाव रोड धुळे याने सदरची चोरी केली असून चोरीतील साहित्य इकबाल अन्सारी रा.काझी प्लॉट वडजाई रोड धुळे यास विक्रीसाठी दिल्याची माहिती मिळाली .यानंतर आरोपी याना ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले  रिवाल्वर, राउंड असा एकूण 1,50,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून विचारपूस केली असता त्यांनी सदर साहित्य त्यास भरत सुरेश चौधरी यांनी दिल्याची कबुली दिली .आरोपी भरत सुरेश चौधरी यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली व दोन्ही आरोपी ताब्यात असून तपास सुरू आहे .
सदरची  कारवाई मा.चिन्मय पंडित सो पोलीस अधीक्षक धुळे , डॉक्टर श्री राजू भुजबळ अप्पर पोलीस अधीक्षक धुळे, सचिन हिरे उप विभागीय पोलिस अधीकारी,  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश बोराडे यांच्या पथकातील मैनोदीन सय्यद ,रफिक पठाण ,गौतम सपकाळ, मुक्तार शेख, रमाकांत पवार, परशुराम पवार, अमोल रामराजे यांच्या पथकाने केली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने