शिरपूर - दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक विभागासाठी आयोजित केली जाते. मात्र यावर्षी कोविड-१९ चा प्रादुर्भाव असल्याने सदर स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे.
तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणातूनच इंग्रजी विषयातील गोडी वाढावी या हेतूने दरवर्षी तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतात. त्यामुळेच दरवर्षी सहभागी विद्यार्थ्यांचा आलेख अधिकाअधिक उंचावत आहे.
संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,
सचिव प्रभाकरराव चव्हाण, सर्व संचालक यांच्या प्रेरणेतून स्पर्धा आयोजित करण्यात येते. संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न होणार आहे.
ऑनलाईन स्पर्धेसाठी शहरी, ग्रामीण, आश्रमशाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, खुला गट असे स्वतंत्र गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातून शाळेकडून दोन उत्कृष्ट विद्यार्थ्यांचे व्हिडीओ १४ तारखेपर्यंत मागविण्यात आले आहेत.
शाळांना नोंदणी करणे आवश्यक असल्याने ऑनलाईन गुगल लिंक मुख्याध्यापकांना व्हाट्सएप व मेलच्या माध्यमातून पाठविण्यात आली आहे.
स्पर्धेत विद्यार्थी घरी राहूनच सहभागी होता येणार आहे. दिलेल्या विषयांवर सुंदर व्हिडीओ वर्गशिक्षकांना पाठवावा. वर्गशिक्षक आयोजक शाळेकडे व्हिडीओ पाठवतील. २ ते ३ मिनिटांत आपला विषय प्रभावीपणे मांडण्याची विद्यार्थ्यांनी तयारी करावी. विद्यार्थ्याला कोणत्याही एकाच गटातून सहभाग नोंदवता येईल.
खुला गटासाठी पाच विषयांपैकी स्पर्धेच्या दिवशी एक विषय आपणास फोनवरून देण्यात येईल, त्या विषयावर आधारित इंग्रजी वक्तृत्व रेकॉर्ड करून आयोजक शाळेकडे नियमानुसार पाठवावे. तसेच तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी केले आहे.
Tags
news
