शिरपूर - राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचा वतीने पूर्ण राज्यभर कोवीड विद्यार्थी-पालक अभियान सुरु करण्यात आले आहे.या अभियानाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थीचे पालक करोणा विषाणुला बळी पडले आणि दुर्देवाने त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला अश्या पालकांच्या पाल्यांच्या शिक्षणाच्या एकुण खर्चांच्या काही खर्चांची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्तींनी घ्यावी असे आवाहन या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
कोविड विषाणू मुळे ज्या विद्यार्थीचे पालक त्यांना सोडून गेले त्या विद्यार्थीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना मदतीचा हात देणे ही समाजातील सर्वच जणांची सामाजिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी जाणुन घेत समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या विद्यार्थ्यांना मदत करणे गरजेचे आहे.या अभियानाच्या माध्यमातून कोरोनामुळे दु:खाचा डोंगर कोसळलेल्या अनेक विद्यार्थी आणि समाजातील दानशूर व्यक्ती यांच्यातील दुवा होण्याचे काम येणार्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसच्या शिरपुर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि सदस्य करतील अशी भुमिका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे शिरपुर तालुकाध्यक्ष शुभम पाटील यांनी मांडली आहे.
याप्रमाणे येणाऱ्या काळात शिरपुर तालुक्यातील विद्यार्थी आणि दानशूर व्यक्तीं यांनी संपर्क करण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम पाटील यांनी केले आहे. तालुक्यातील ज्या विद्यार्थीचे पालकांचा करोणा च्या साथीने दुर्दैवी मृत्यू झाला अश्या प्रत्येक विद्यार्थिपर्यंत पोहोचत त्यांना मदत करणार असल्याचे देखील राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे शिरपुर तालुकाध्यक्ष शुभम पाटील व शिरपुर शहराध्यक्ष भूपेश पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थी पालक व दानशुर व्यक्तींचा संपर्क करण्यासाठी.
शुभम पाटील (७५०७८८०१७५)
भुपेश पाटील (९१५६७९१८११)
संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
news
