माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त मांडळ गावा जवळ ए.के.नगर ओपन स्पेसमध्ये भूपेशभाई ग्रीन आर्मी तर्फे महावृक्षारोपण




शिरपूर - माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त मांडळ गावा जवळ ए.के.नगर ओपन स्पेसमध्ये भूपेशभाई ग्रीन आर्मी तर्फे महावृक्षारोपण दिवस साजरा करण्यात येऊन नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाला नगरसेवक तपनभाई पटेल, भाजपा प्रदेश सदस्य बबनभाऊ चौधरी, भाजपा धुळे जिल्हा उपाध्यक्ष के.डी.पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, माजी जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, पं.स.सदस्य वैशालीताई सोनवणे, मांडळचे भटू आप्पा माळी, छगनदादा बागुल, मोहनदादा सोनवणे, माजी सरपंच सुनील सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, नगरसेवक भुरा राजपूत, नगरसेवक संजय कोळी, युवा तेली प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत ईशी, शिरपूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष हेमंत सनेर, अजंदे सरपंच राजेंद्र पाटील, सुरेश अहिरे, वसंत सूर्यवंशी, सुभाष चौधरी, प्रकाश गुरव, माळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, भुपेश परदेशी, दिनेश सोनवणे, जितेंद्र बागुल, बापू गोपाळ, विलास पाटील, अजबसिंग राजपूत, चंद्रकांत बागुल, अशोक बागुल, रामचंद्र येशी, नामगे सर, विशाल सोनवणे, शुभम माळी, जगन्नाथ थोरात, सागर सुरेश माळी, युवराज माळी, संदीप सोनवणे, चेतन पाटील, नामदेव गोपाळ, भाईदास बागुल, भारत साळी, आशिष पाटील, निलेश सोनवणे, तुषार सोनवणे, राहुल माळी, अनिल शिंदे, तुषार शिंदे, रंजन नामगे, जयेश सोनवणे, किरण थोरात तसेच कॉलनी परिसरातील श्रीराम माळी, प्रल्हाद पाटील, ब्रिजलाल राजपूत, शिवाजी पाटील, अविनाश पाटील, रमेश लोहार, युवराज पाटील, विशाल गिरासे, दीपक मराठे, शशिकांत वानखेडे, विजय पाटील, कोळी सर, हितेंद्र जमादार, देशमुख वायरमन, दिलीप पाटील, किरण पाटील, देवेंद्र वारुळे, अनिल पाटील, संजय जगताप, सुनील माळी, भटू शेवाळे, डिगंबर पाटील, बापू भील, रवींद्र माळी, सौरभ सुतार, संदीप सोनवणे, प्रकाश भोई उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल काळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन भुपेशभाई ग्रीन आर्मी चे सर्व सदस्य व यतीश सोनवणे यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने