यशोगाथा भाईसाहेबांची ,पोवाडा काव्य





पोवाडा काव्य
       यशोगाथा भाईसाहेबांची
यशोगाथा वर्णावी भाईंची,शिरपूरच्या विकासपुरुषाची,शिक्षणमहर्षींची,  अमरिशभाईसाहेबांची.......
उद्योग व्यवसायाची मूहर्तमेढ रोवली
विकास कामांना गती दिली
शिरपूर झाली उद्योगनगरी ..........जी...हो..जी..।।
जलसिंचन योजना आखून धरणं आणि बांध खोदून
पाणी संचयन करून
' शिरपूर पँटर्न ' जगी झाला मशहूर ......जी...हो..जी..।।
वृक्ष संवर्धनाचा घेतला वसा...
'हरित शिरपूर सुंदर शिरपूर' बदल झाला असा ...
रानोमाळ हिरवे झाले शेतशिवारी 
                  ..........जी...हो..जी..।।
शिक्षणक्षेत्रात केली भरभराट
ज्ञानगंगा आणली गावागावात
दर्जेदार शिक्षणाने प्रसिद्ध झाली विद्यानगरी..........जी...हो..जी..।।
शहराचा सर्वोतोपरी विकास केला
पाणी ,रस्ते ,वीज,शिक्षण, रोजगार जनतेस दिला
कार्यसम्राट विकासरत्न लाभले शहराला
जनसेवेतच कर्म पाहिले ईश्वरी ..........जी...हो..जी..।।
सेवाभाव स्वच्छ राजकारभार
शिरपूर नगरीचे थोर शिल्पकार
म्हणून विराजमान झाले जनतेच्या अंतरी..........जी...हो..जी..।।

                     - लेखन
             श्रीमती एम.डी.पाकळे
                 उपशिक्षिका
        एच.आर.पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने