शिरपूर दि. ५ - अर्थे येथील कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालय येथे ग्रामीण मराठी पत्रकार संघा कडुन आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
दिनांक. ५ सप्टेंबर २०२० वार शनिवार रोजी,शिक्षक दिन व किसान विदया प्रसारक संस्थेचे माजी सचिव,कै.दादासाो.विश्ववासराव रंधे ,छत्रपती पुरस्कार विजेते ,यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून
*ग्रामिण मराठी पत्रकार संघ,तऱ्हाडी*
ता.शिरपूर कडुन,
तालुक्यातील विदयार्थी प्रिय व उपक्रमशिल माध्यमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षक यांना ,
*तालुका स्तरीय आदर्श शिक्षक* पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षण विस्तार अधिकारी *श्री.आव्हाड साहेब*,
अर्थे बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी *श्री.डी.पी.बुवा* व कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालय अर्थे येथील प्राचार्य श्री.आर. बी. महाजन सर
व मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय अर्थेच्या मुख्याध्यापिका, श्रीमती.उषा पाटील,शिरपूर तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना अध्यक्ष, श्री. अशोक महाजन पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. रावसाहेब चव्हाण,उपाध्यक्ष महेंद्र खोंडे,सचिव दिलवरसिंग गिरासे, सदस्य भिका चव्हाण व संदीप ईशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांची नावे अनुक्रमे
*१)श्री.लक्ष्मण आधार पाटील*
(माध्यमिक शिक्षक)
मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय अर्थे ता.शिरपूर जि. धुळे
*२) अरूण जगतराव पाटील* (माध्यमिक शिक्षक)*
आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक टेकवाडे ता.शिरपूर जिल्हा.धुळे
*३)श्रीमती.सिमा सुभाष पाटील*
(प्राथमिक शिक्षिका)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभानपूर ता.शिरपूर जि.धुळे
*४) डॉ.श्री.भुपेंद्रसिंग देवबाप्पा राजपूत*
(प्राथमिक शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवापाडा (मुखेड )ता. शिरपूर जिल्हा धुळे
*५)श्री.अनिल खंडेराव पाटील*
(माध्यमिक शिक्षक)
आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय तऱ्हाडी तालुका. शिरपूर जिल्हा धुळे
या शिक्षकांना सन्मानीत करण्यात आले.
- पुरस्कारार्थीनीं आपल्या मनोगतात पत्रकार संघाचे आभार व्यक्त केले.
-- शिक्षण विस्तार अधिकारी श्री. डी. पी. बुवा यांनी आपल्या मनोगातात पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले,व शिक्षकांनी आपल्या सेवत कसे काम करावे या बाबत मार्गदर्शन केले.
--- मुख्याध्यापक, श्री. आर.बी महाजन यांनी विनोदी पदधतीने,शिक्षकी पेशात कसे- कसे कार्य करणारी लोकं आहेत ते सोदाहरण सांगीतले.
--अध्यक्षीय भाषणात श्री. आव्हाड साहेब यांनी पुरस्कार्थीचें अभिनंदन केले. व समाजात आपले निरिक्षण करणारे घटक असतात ते आपल्या कामाचे निरिक्षण करुन आपला सन्मान करीत असतात. तसा आज पत्रकार संघाने तुमचा सत्कार केला. या पुरस्काराची व्याप्ती वाढविण्याची सुचना त्यांनी या वेळी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रावसाहेब चव्हाण यांनी ,सुत्रसंचलन श्री.एन. बी. पाटील,सर,यांनीकेले,तरआभार
श्री.अशोक महाजन यांनी मानले. कार्यक्रमास अर्थे येथील तीनही शाखांचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर बंधु- भगीनी उपस्थित होते. व त्यांचे सहकार्य लाभले.
Tags
news

