धुळे शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्वच शासकीय कार्यालये एकाच छताखाली येणार..




राज्य शासनाचा भाडे पोटी खर्च होणारा पैसा वाचवून त्याच पैशांचा जनतेच्या हिताच्या कामांसाठी होणार वापर -- आमदार फारूक शाह

धुळे - धुळे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे साधारणतः ३८ ठिकाणी शासनाचे भाडेतत्वावर घेतलेले वेगवेगळी कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या भाड्या पोटी शासनाला दर माहे ४० ते ५० लाख रुपये मोजावे लागतात. तसेच ही संपुर्ण कार्यालये शहरात दूर दूर पर्यंत विखुरलेली असल्याने जनतेला खास करून ग्रामीण व लांबच्या कॉलोनी वसाहतीतून दैनंदिन कामे करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे त्यांच्या पदरी मनस्तापच येतो तसेच जनतेचा पैसा आणि वेळ वाया जातो. जनतेची कामे एकाच छताखाली व्हावी त्यांना विविध ठिकाणी फिरावयास लागु नये यासाठी शासनाने विविध खात्यांची कार्यालये एकत्र आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी धुळे शहरातील (बस स्थानक व रेल्वे स्थानकाजवळ) सर्वे क्रमांक ३५१२ या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नियोजित जागेच्या ठिकाणी व्हावे जेणेकरून धुळे शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली येतील व शासनाचा खर्च होणारा पैसा वाचेल व हा पैसा जनतेच्या हिताच्या इतर कामांसाठी उपयोगात येईल. याच कारणास्तव धुळे शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय संकुलाचे बांधकाम होण्यासाठी B.O.T. तत्वावर मंजुरी देण्यात यावी या आशयाचे निवेदन धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी नामदार श्री. अशोक चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम  विभाग, मंत्री यांना मुंबई येथे भेट घेत सादर केले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने