शिक्षण विस्तार अधिकारी योगेश सावळे यांना पीएचडी पदवी बहाल!




शहादा प्रतिनिधी अश्विन सोनवणे :-*धडगाव शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी श्री.योगेश मोतीराम सावळे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे नुकतीच डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. पीएच.डी. पदवी संपादन केल्याने डाॅ.सावळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नंदुरबार शिक्षण विभागात प्रयोगशील अधिकारी म्हणून डाॅ.योगेश सावळे यांची गणना होते. त्यांनी धडगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागा अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या शाळांमध्ये अनेक प्रयोगशील उपक्रम केले आहेत. त्यांना त्यांच्या सेवा जबाबदारीच्या पदावरून शिक्षण क्षेत्रात जे जे प्रायोगिक बदल झाले त्यांच्या  वर्तन-परिवर्तनाला व अपेक्षित परिणामांना अभ्यासण्याची संधी मिळाली. त्याआधारे श्री. योगेश मोतीराम सावळे यांनी *"गटसाधन केंद्र निर्मितीनंतर शिक्षण विभागातील कार्यप्रणालीत झालेल्या बदलांचा अभ्यास"* या विषयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या शिक्षण शाखेत आपला शोधनिबंध सादर केला. सदर शोधनिबंध कार्यात *प्राचार्या डॉ. सौ. देवानंदा सांखला* यांनी मार्गदर्शन केले. शोध निबंधाच्या माध्यमातून त्यांनी पीएच.डी. समितीला आपले संशोधन पटवून दिल्यानंतर विद्यापीठाने त्यांना "विद्या वाचस्पती" ही पदवी बहाल केली. प्रयोगशील विस्तार अधिकारी म्हणून शिक्षण क्षेत्रात ओळख असलेल्या डाॅ.योगेश सावळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने