शहादा प्रतिनिधी अश्विन सोनवणे
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद च्या शहादा तालुका युवक आघाडी अध्यक्षपदी प्रविण आत्माराम माळी उर्फ़ बंटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्या प्रसंगी शहादा येथील क्रांति सूर्य महात्मा फुले व सावित्री बाई फुले स्मारक येथे हे नियुक्ति पत्र देऊन अभिनदंन करण्यात आले त्या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघ यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले त्या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषेदेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे जिल्हा सरचिटणीस रमाशंकर माळी शहादा तालुका अध्यक्ष जगदीश माळी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर वारुडे बापू शेवाड़े नाना मिस्तरी लोटन धोबी आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रवीण माळी यांनी आपले मनोगत व्यक्त करत म्हटले की शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा व त्याचा जीवन चरित्र्यांचा आभ्यास गोरगरीब जनते पर्यंत पोहचवायचे कार्य मी करीत राहीन व नामदार छगनराव जी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शना खाली कार्य करीत राहीन अशी ग्वाही यावेळी प्रविण माळी यांनी दिली
Tags
news
