शिरपुर : धुळे शहरात पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यास गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली त्याचा आम्ही शिरपूर भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र निषेध करतो व राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी या मारहाणीची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आ. काशिराम पावरा यांनी केली. लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची संवेदनशीलतेने दखल घेण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पोलिसांकरवी मारहाण करणे हा मस्तवालपणा आहे विद्यार्थ्यांंना मारहाण करणारे करणारे जे जे पोलिस कर्मचारी व अधिकारी दोषी आहेत असे सर्वच पोलिस कर्मचार्यांना व अधिकारी यांना निलंबीत करण्यात यावेत अशी मागणी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी केली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची बिनशर्त सुटका करावी तसेच या विद्यार्थ्याच्या मागण्यांची सहानुभूतीने दखल घ्यावीत अशी मागणीचे निवेदन शिरपूर भाजपा तर्फे तहसिलदार आबा महाजन यांच्याकडे (दि.३१ आॅगस्ट) रोजी केली. त्यावेळी आ. काशिराम पावरा व भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी मागणी केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापूरे, मा. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, भाजपा शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोरसे, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहीत शेटे, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, प्रशांत राजपूत, शहर राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, मा. शहर सरचिटणीस सुनिल चौधरी, बुथ अध्यक्ष राजुलाल मारवाडी, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष रविंद्र सोनार, भटक्या विमुक्त आघाडी शहराध्यक्ष रविंद्र भोई आदि उपस्थित होते. निवेदनात पुढे नमुद करण्यात आले आहे कि आपल्या रास्त मागण्या पालकमंत्र्यांना सादर करण्यास धुळे येथे अभाविपचे कार्यकर्ते गेले होते. दोन दिवस विनंती करूनही पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थ्यांना भेट नाकारली. त्यामुळे त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक होते. तथापि, त्यांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली व त्यांच्या पैकी काही जणांना ताब्यात घेतले. लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण काही करत असल्याचा दिखावा महाविकास आघाडी सरकार करत असते. पण प्रत्यक्षात आज पोलिसांनी निवेदन देणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यामुळे या सरकारचा मुखवटा फाटला आहे व मस्तवाल चेहरा दिसला आहे. या सरकारचा आम्ही जाहिर निषेध करीत असुन राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा व विद्यार्थ्यांना मारहाण करणार्या जे जे कोणी दोषी आहेत त्या पोलिसांना व अधिकारींना निलंबीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
Tags
news
