आर .सी .पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालय शिरपूर येथील प्रा. डॉ. दिपक प्रभाकर बाविस्कर यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून एम. फिल आणि पीएच.डी यासाठी संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाने प्रसिद्ध झालेल्या यादीत शिक्षणशास्त्र या विषयासाठी डॉ. दिपक प्रभाकर बाविस्कर यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे. त्यांना आता चार पीएच. डी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून लघु संशोधन प्रकल्पास आर्थिक अनुदान देण्यात आले होते. त्यांनी तो संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला होता त्या अनुदानातून महाविद्यालय साठी संदर्भ पुस्तके, स्पर्धा परीक्षा संदर्भ, संशोधन उपयुक्त साधने उपलब्ध करून दिली होती. स्पर्धा परीक्षा अतिथी मार्गदर्शक विविध क्लासेस व संस्थेतील वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना MPSC चे मार्गदर्शन करीत असतात. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव बहिस्थ पदव्युत्तर विभागात समाजशास्त्र या विषयाचे अध्यापन करतात.
डॉ. दिपक बाविस्कर हे 5 विषयात पदव्युत्तर पदवी, 2 विषयात सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण, एम.फिल ,पीएच.डी या पदव्या संपादन केल्या आहेत. शैक्षणिक कार्य म्हणून आंतराष्ट्रीय शोध पत्रिकेत जवळपास 40 संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत, विविध चर्चासत्रे, परिषदेत, कार्यशाळेत, प्रशिक्षण वर्ग त्यांचा मार्गदर्शक म्हणून व सक्रिय सहभाग असतो, विद्यापीठातील सर्वोच्च कामात सहभागी असतात, महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर देखील नामनिर्देशित सदस्य म्हणून सक्रिय काम करतात. त्यांचा या 12 वर्षातील अध्यापनाचा, संशोधनाचा व प्रशासकीय कामांचा अनुभव महाविद्यालय संस्थेच्या विविध प्रशिक्षणासाठी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होत असतो.
संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्यावर त्यांच्या या नियुक्तीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल ,कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रीमती.जयश्रीबेन पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकररावजी चव्हाण , माजी कुलगुरू डॉ. के. बी .पाटील , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा,प्राचार्य डॉ. एच .वाय .देवरे , संस्थेतील विविध शाखेतील कर्मचारी वर्ग तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील प्राध्यापक वृंद, तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद ,यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
news

