कल्पेश राजपूत, शहादा
नंदुरबार - नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील # कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आणखी ५ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . ( २८ स्त्री , ३१ पु . , ५५ स्त्री , ६ वर्षाची मुलगी , ३१ पु . ) तसेच २ जिल्हा रुग्णालय कर्मचारी ( २७ आणि ३२ वर्षे पु . ) व धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील ३५ वर्षाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे . नागरिकांनी दक्षता बाळगावी . आजाराची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी . अनावश्यक बाहेर फिरू नये आणि मास्कचा वापर करावा , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे . जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या आता ९ झाली आहे .
