सुट्टी महामारीची




लावली कोरोनान हजेरी 
सुरु झाली महामारी 
माणसं घाबरली सारी 
 बसली घरो घरी.... 

शुकशुकाट भासला पृथ्वीवरी 
बंद उधोग सारी 
कामगारांना आली उपासमारी 
थांबल्या लग्नाच्या पोरी... 

गाठोडं घेऊन पाठीवरी 
संसार घेऊन डोक्यावरी 
रडताय  पोरं खांद्यावरी 
मरताय सारी  कष्टकरी.... 

शेतकरी आहे बांधावरी 
खायला मिळेल तरी 
तो मेला जरी 
पोसली जाईल दुनियासारी... 

राजकारणी श्रीमंत मश्गुल 
गरिबांची बत्ती गुल 
त्यास चारदाण्याचं पानफूल 
केलंय दाखवताय फुल... 


प्रदीप मनोहर  पाटील 
गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव 
मो. 9922239055©️®️

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने