शिरपूर शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह, शहरात खडबड सावधानतेचा इशारा



शिरपूर -  काल रात्री शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असून  शहरावर कोरोना संकट आले आहे . शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याचे निष्पन्न होत होते.मात्र मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरात एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.शहरातील भुपेश नगर भागातील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे रात्री उशिरा समोर आले आहे.


शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रातील संपूर्ण शिरपूर शहरात दि. २० मे २०२० ते दि. २२ मे २०२० या तीन दिवसांच्या काळात शहरातील हाॅस्पिटल व औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहतील.


संपूर्ण शिरपूर शहर हे दि. २० मे ते दि. २ जून २०२० या कंटेन्टमेंट झोनमध्ये असणार आहे. दि. २३ मे ते २ जून दरम्यान केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहतील.


लाॅकडाऊनच्या काळात कोणीही नागरिकाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा आणि कलम 188 नुसार कडक कारवाई करण्यात येईल. असे आदेश मा.प्रांताधिकारी डाॅ. विक्रम बांदल यांनी दिले आहेत.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने