शेकडो मजुरांनी गाठली पायपीट करत आपली मायभूमी




मालेगावहुन परतले शेकडो मजूर ; भोरटेक येथे केले क्वारंटाइन

शहादा (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात परजिल्ह्यात, परराज्यात मजूर जागच्या जागी अडकून पडले. हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले, मालेगाव तालुक्यातील मुग्सा या गावी कामानिमित्त गेलेल्या मजुरांनाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. १४ एप्रिलला २१ दिवसाचे लॉकडाऊन संपून आपल्याला आपल्या गावी जाता येईल , या अपेक्षेत असलेल्या मजुरांची लॉकडाऊनचा ३ मे पर्यंत कालावधी वाढल्याने घोर निराशा झाली. तर वृद्ध मातापित्यांना कुणाचा आधार नाही. अशा कोणत्याही परिस्थितीत गावी जायचे या विचाराने विचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन या मजुरांनी थेट गावाकडची वाट धरली शेकडो किलो मीटरची पायपीट करू या मजुरांनी चार ते पाच दिवसात आपले गाव गाठले मजुरांना मालेगाव पासून धुळे पर्यंत पोहोचल्यावर धुळे येथील पोलीसांकडून त्यांना जेवणाची सोय करण्यात आली. तेथून परत पायपीट करत सोनगीर गाठले सोनगीर हुन काही मजुरांना मालवाहतूक गाडी वरून दरा फाटा पर्यंत पोहोचले असता भोरटेक येथून ट्रॅक्टर पाठविण्यात आले.  तर त्या मजुरांनी अश्या पद्धतीचा प्रवास करत आपली मायभूमी गाठण्याचा प्रेयत्न केला.     रात्री उशिरापर्यंत मजुरांना स्थानिक प्रशासनाच्या डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून होम क्वारंटाइन करण्यात आले, मजुरांची स्क्रिनिंग करण्यात आले त्यांना होमक्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र आपल्या मायभूमीत पोहोचलो असल्याचे समाधान या मजुरांनी व्यक्त केले. त्यावेळी स्थानिक आरोग्य विभागाचे डॉक्टर हेमंत बच्छाव, बी. डी.ओ सी. टी. गोस्वामी, विस्तार अधिकारी दिगांबर बेलदार, विस्तार अधिकारी भरत निकुंबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार, पो.कॉ. घनश्याम सूर्यवंशी, ग्रामसेविका रुपाली सिसोदिया, सरपंच मिनाबाई पवार, उपसरपंच प्रतिभाबाई पवार, अंगणवाडी सेविका नंदाबाई पवार, रामदास वाघ, दिलीप पवार, जयसिंग पवार, सुनील पवार, गोपाल ठाकरे, कल्पेश राजपूत, जयपाल सिसोदिया, प्रदीप पवार, गुमान चव्हाण, सुक्राम पवार, गुरू मुसळदे, विनोद ठाकरे आदी उपस्तिथ होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने