शिरपूर प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी धुळे जिल्हा कृषी अधिकारी यांना अर्ज केला आहे की जिल्ह्यातील शेतकरी कापूस पिकाच्या लागवडीसाठी तयार असून त्यांना कापसाचे बियाणे उपलब्ध होत नाही याबाबत कृषी विक्रेते दुकानदार यांना विचारणा केली असता बियाणे विक्रीस परवानगी नाही अशा प्रकारची उत्तरे दिली जातात. अनेक दुकानात माल उपलब्ध असून देखील कापसाचे बियाणे उपलब्ध न झाल्यामुळे शेतकरी चिंतातुर आहे. तरी मे महिन्याच्या चौदा पंधरा तारखेपर्यंत बियाणे विक्रीस परवानगी देण्यात यावी असा विनंती अर्ज शिरपूर तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य भरत भिलाजी पाटील , योगेश बादल पावरा यांनी केला आहे.
धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापसाचे बियाणे उपलब्ध करून द्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
byMahendra Rajput
-
0
